Homeताज्या बातम्यासोमवारी हिंजवडी येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोमवारी हिंजवडी येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोमवारी हिंजवडी येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, पुणे व अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट, बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ग्रँड तमन्ना हॉटेल, प्लाट नं १६, फेज-२, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे येथे “पंडीत दीनदयाल उपाध्याय दिव्यांग रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सा.बा. मोहिते यांनी कळविली आहे.

या दिव्यांग रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील नामांकित २० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्याकडून ९०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक दिव्यांग उमेदवारासाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक दिव्यांग उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांसाठी अर्ज करावा. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी सोमवारी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याच्या विकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही श्रीमती मोहिते यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!