Homeआरोग्यतनीशाचा दुर्दैवी अंत ; रुग्णालयाचा हलगर्जीपणा

तनीशाचा दुर्दैवी अंत ; रुग्णालयाचा हलगर्जीपणा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

तनिषा आणि सुशांत च्या आयुष्यात आठ वर्षांनंतर गुड न्यूज झाली होती. मात्र हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आठ वर्षानंतर न मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या तनिषाचा असा दुर्दैवी अंत होणं, हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी विचार करण्यासारखं आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती तनिषा भिसे यांना १० लाख रुपयांची आगाऊ रक्कम न भरल्यामुळे दाखल करण्यास नकार दिला, असा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेले, जिथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने तनिषा यांचे निधन झाले.

तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. सुशांत भिसे यांनी सांगितले की, रुग्णालयाने १० लाख रुपये आगाऊ भरण्याची मागणी केली होती. त्यांनी तत्काळ २.५ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, परंतु रुग्णालयाने उपचार नाकारले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, जिथे तनिषा यांचे निधन झाले.

तनिषा आणि सुशांत दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा -सुशांतला लाभलं नाही.

विशेष बाब म्हणजे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत. म्हटल्यावर त्यांनी दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचे काहीही न ऐकता पैसे भरले तरच उपचाराला सुरवाक केली जाईल. असे सांगितले. अखेर सुशांत मोनालीला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे भरती केलं आणि मोनालीने २ गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला, आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आपला जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. तसेच प्रशासनाने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सध्या तनिषा ने जन्म दिलेल्या २ चिमुरड्या मुलींवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु असून एका बाळाला नुकतंच व्हेंटिलेटवरुन काढलं आहे. दोन्ही बाळांची स्थिती स्थिर आहे. मोनालीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!