Homeताज्या बातम्याजात पडताळणी करण्यास 30 एप्रिल पर्यत मुदतवाढ

जात पडताळणी करण्यास 30 एप्रिल पर्यत मुदतवाढ

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

बारावीनंतर कोणत्याही एका व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित आहात? यासाठी आपणास राखीव जागांवर प्रवेशद्वार हवाय? या तीन प्रश्नांची उत्तरे हो असतील तर, आपणास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठीची अजूनही कायम आहे.कारण  इच्छुक विद्यार्थ्यांना यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे पात्र विद्यार्थ्यांना येत्या ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

समता पंधरवाड्यानिमित्त सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या आणि  बारावीनंतर  व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आता येत्या ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ मुदत संपल्यामुळे अर्ज न करु शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. ‘सीइटी’, ‘जेईई’, ‘नीट’ आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि त्यानंतर  वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए., एम.सी.ए., एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. 

अर्ज कोठे कराल? 

इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in  किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. या ऑनलाइन अर्जाची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी दाखल करावेत, असे आवाहन या विभागाचे उपायुक्त आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे  सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!