Homeताज्या बातम्यामहार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट...

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

: महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा या प्रमुख मागणी साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाला पोस्ट कार्ड पाठवण्याच्या अभियाना ची सुरुवात करण्यात आली. 

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या अभियानात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे पंधरा हजार नागरिकांनी सहभाग दर्शवला. अंदाजे एक लाख पोस्टकार्ड पुणे शहरातून पाठवण्याचा मनोदय यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे व महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक कॅप्टन भगवान इंगोले, नायक सुरेश वानखडे, नायक धनराज गडबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

पोस्ट कार्ड पाठवण्याच्या मोहिमेमध्ये आंबेडकरी चळवतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे,  आरपीआय आठवले गटाचे प्रादेश संघटक परशुराम वाडेकर,  अॅड.   मोहन वाडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे,  रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, दलित पॅंथर ऑफ इंडियाचे बापूसाहेब भोसले,  रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे,  रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे विवेक बनसोडे, भिम सेवा प्रतिष्ठानचे राम डंबाळे, सिद्धांत सुर्वे, निखिल बहुले इत्यादी सहभागी झाले होते. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक डंबाळे, राहुल नागटिळक यांनी केले यावेळी महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवण्यासाठी राज्यभरातून किमान दहा लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा मानस असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!