Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याअक्षयतृतीयेच्या दिवशी बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अक्षयतृतीयेच्या दिवशी बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

अक्षयतृतीया सणानिमित्त (३० एप्रिल) आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, तसेच संबंधित यंत्रणेने या विवाह सोहळ्यात वधूचे वय १८ वर्षे व वराचे वय २१ वर्ष असल्याची खात्री करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

अक्षयतृतीया सणानिमित्त आयोजित सामूहिक विवाह बाल विवाहाची शक्यता लक्षात घेता महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी अक्षयतृतीया निमित्त होणारे बालविवाह रोखण्या संदर्भात ऑनलाइन बैठक घेतली आहे.

या बैठकीत बाल विवाह रोखण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेषतः रेड फ्लेग (स्कूल ड्रोप आउट) मुलींकडे विशेष लक्ष द्यावे. “बालिका” या शाळा बाह्य होणार नाहीत अथवा त्या बालविवाहामध्ये अडकणार नाहीत याची प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षकांनी दक्षता घेण्यात यावी.

“बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याच्या अंमलबजावणी करिता गठीत बाल विवाह प्रतिबंधित अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, “ग्राम बाल संरक्षण समिती” यांना “अक्षयतृतीया” या मुहूर्तावर बालविवाह होत असल्यास ते रोखण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या शहरात, गावात बाल विवाह होणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी. याकडे प दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल.

तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती व विवाहाशी संबंधित मंडप डेकोरेटर्स, विवाह कार्य करणारे धार्मिक गुरु, मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक, बँड पथक वाफ, हॉटेल व्यवस्थापक, केटरर्स आदी व्यावसायिक यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्यातील तरतुदींचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे, अशी माहिती श्री. डुडी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!