Sunday, August 23, 2026
spot_img
Homeक्राईमव्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीला ४२ कोटी भरावेच लागतील, महसूलमंत्री...

व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीला ४२ कोटी भरावेच लागतील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रश्नामुळे विभागच संभ्रमात

पुणे 24 तास : मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी अशा ४२ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून या विभागाचे मंत्री अर्थात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या नोटिशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, दस्त रद्द करण्यासाठी ४२ कोटी रुपये भरावेच लागतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने विभागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुळात ही सरकारी जमीन असताना तेजवानी यांनी ही जमीन अमेडिया कंपनीला विकली जमिनीची किंमत ३०० कोटी रुपये दर्शवून दस्त नोंदणी करण्यात आली. ही नोंदणी करताना केवळ पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर व्यवहार पूर्ण करण्यात आला. यानंतर झालेल्या गदारोळात अजित पवार यांनी व्यवहार रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. व्यवहार रद्द करण्यासाठी पहिला झालेला दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी आणि हा दस्त रद्द करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार आणखी २१ कोटी रुपये भरल्यास भरावे लागतील, अशी नोटीस दिली.

हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने नोटीस बजावताना देखील कायद्यातील बाबींची अभ्यास करण्यात आला. त्यानंतरही खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्कातून सूट द्यायची आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे, याकडे सुत्रांनी लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!