लेखक: मुबारक तांबोळी, librarian PIMSE)
कधी कधी मनात अचानक एक प्रश्न येतो – आपण नक्की कोणत्या जगात जगत आहोत?
पुणे 24 तास:- ना समाधान, ना खरा आनंद… सुख-दुःख सगळं जणू कृत्रिम झालंय. आज फोटो काढताना देखील कुणीतरी “कृपया हसा” म्हणायला लागतं. बाहेरून हसतो, पण आतून मात्र रिकामे झालोय.
आज आपण पैशाच्या मागे एवढे धावत आहोत की जे गोष्टी आपल्याला फुकट मिळत होत्या, त्याच विसरायला लागलो आहोत. एके काळी मागे वळून पाहिलं तर वाटतं – आपण जगतो आहोत की आपल्याला जगवलं जातंय?
लहानपणी आपले विचार किती निरागस असायचे. “मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, पोलीस होणार, समाजसेवक होणार” – अशी स्वप्नं डोळ्यात साठवलेली.
पण आज? ना आपण आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो, ना स्वतःचे.फक्त EMI, भाडे, हॉस्पिटल, आणि पोलिस स्टेशनची धावपळ यापेक्षा जीवनात काही आहे का, असा प्रश्न मनाला सतत कुरतडत राहतो. बालपण – जिथे आनंद मोफत होता
एक काळ होता…मित्रांसोबत रात्री बारा वाजेपर्यंत बसून गप्पा मारणे, रविवारी क्रिकेट सामन्यासाठी आठवडाभर तयारी करणे, आईच्या हातचं गरम जेवण, बाजारातून आणलेली भेळ, भावा-बहीणीसोबत वाटून खालेली चॉकलेट…हे सगळं पैशाने खरेदी करता येतं आज, पण त्या काळाचा गंध, तो निरागस आनंद, तो प्रेमाचा स्पर्श, पुन्हा मिळवता येत नाही. नाती तुटतात, पण कारणं किरकोळ असतात. आज भाऊ-बहिण एकमेकांशी संपत्तीवरून बोलत नाहीत. नाती, विश्वास, जवळीक—सगळं कुठेतरी हरवत चाललंय. आपल्या डोळे उघडे असतात, पण काहीच दिसत नाही.
मनात मात्र एक खंत… “आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करू शकलो का?” “स्वतःसाठी काय मिळवलं?” “आपण खरंच आनंदी आहोत का?” जर हसू येण्यासाठी आपण टीव्ही शो पाहत असू, आणि फोटो काढताना “हसा” असं सांगावं लागत असेल, तर खरंच आत्मचिंतनाची गरज आहे.
आजच्या जीवनाचे सत्य आपल्याकडे सर्व काही आहे.
मोबाईल, पैसे, गाडी, नोकरी पण मन:शांती नाही, समाधान नाही आनंद नाही, त्यामुळे हेच आजच्या जगाचे सर्वात मोठे दु:ख आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























