Saturday, November 21, 2026
spot_img
Homeपुणेहजारो लिटर पाण्याची नासाडी थांबली! ग्रँड शालीमार परिसरातील गळती दोन दिवसांत दुरुस्त

हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबली! ग्रँड शालीमार परिसरातील गळती दोन दिवसांत दुरुस्त

ग्रँड शालीमार हॉटेलजवळील पिण्याच्या पाण्याची गळती दोन दिवसांत दुरुस्त; अंझर राडे देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : मोहम्मदवाडी येथील NIBM परिसरातील ग्रँड शालीमार हॉटेलजवळ पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते हुसैन शेख यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अंझर राडे देशमुख यांनी संबंधित प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, अवघ्या दोन दिवसांत पाण्याच्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली आहे.

ग्रँड शालीमार हॉटेलजवळील परिसरात दररोज संध्याकाळी पाणीपुरवठा सुरू होताच पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. एकीकडे राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

ही समस्या सामाजिक कार्यकर्ते हुसैन शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने अंझर राडे देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अंझर राडे देशमुख यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत पाणीगळती थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

या समस्येच्या निराकरणासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून देण्यासाठी जयमाला ढाणकीकर मॅडम आणि श्री. अमर गव्हाणे यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या समन्वयातून प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत पाइपलाइनची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवली.

या कामात सामाजिक कार्यकर्ते हुसैन शेख यांनी दाखवलेली तत्परता आणि अंझर राडे देशमुख यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. तसेच योग्य अधिकाऱ्यांपर्यंत समस्या पोहोचवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या जयमाला ढाणकीकर आणि अमर गव्हाणे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी अंझर राडे देशमुख म्हणाले की, “महाराष्ट्रातील अनेक भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील पाणीगळती किंवा इतर नागरी समस्या निदर्शनास आणून द्याव्यात. प्रशासनाच्या सहकार्याने त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

या घटनेतून नागरिकांची जागरूकता, सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार आणि प्रशासनाशी योग्य समन्वय साधल्यास स्थानिक समस्यांचे जलद निराकरण होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टिंबर मार्केटमध्ये आगीचा भडका! लाकडी दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान; अग्निशमन दलाची रात्रभर...

0
पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव! 50 ते 60 दुकाने जळून खाक; 27 अग्निशमन वाहने घटनास्थळी पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (18...

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

error: Content is protected !!