Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगशिवरायाचा आदर्श ठेवावा

शिवरायाचा आदर्श ठेवावा

पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे यांचे प्रतिपादन

पुणे  ( पुणे 24 तास ब्युरो )

:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी प्रत्येक वेळी ती स्थिती अनुकूल केली आणि एकाच वेळी विविध संकटांवर मात करीत रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा हा आदर्श प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी बुधवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. भुजंग खंदारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण) यांची उपस्थिती होती. यावेळी शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचा कार्यक्रम झाला. वडूज (सातारा) येथील शिवशाहीर श्री. राजेंद्र सानप तडवळेकर व सहकाऱ्यांनी पोवाडे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पुणे प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, स्वराज्य स्थापनेसाठी जाती, पंथ, धर्मापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी सहकाऱ्यांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. संधी देऊन त्यांच्या क्षमतेचा विकास केला. आत्मविश्वास निर्माण केला. शूरवीर माणसं घडवली. यासोबतच रयतेसाठी निर्माण केलेल्या स्वराज्याला माणूसकीच्या मूल्यांचे अधिष्ठान दिले. लोकाभिमुख व सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या प्रशासनाचा आदर्श शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय यंत्रणेतून आपल्याला मिळतो. तो आदर्श समोर ठेऊन वीजग्राहकांना सेवा देण्याचे आवाहन श्री. खंदारे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. शिवाजी शिवनेचारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त आयोजन समितीने पुढाकार घेतला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!