Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणीची कार्यवाही सुरु

पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणीची कार्यवाही सुरु

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

कुक्कुट पक्ष्यांचा ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमधील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेस परिक्षणासाठी सादर करुन तपासणीची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे शहराजवळील खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधीत क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या भागातील ११ कुक्कुट प्रक्षेत्राना भेट दिली. या प्रक्षेत्रामध्ये वेंकटेश्वरा समुहाचे ६ अंडी देण्यासाठी कुक्कुट पक्षी संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि ५ व्यक्तिगत मांसल कुक्कुट पालन प्रक्षेत्र आहेत. वेंकटेश्वरा समुहाचे कुक्कुट पालन प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले व त्यापैकी दोन प्रक्षेत्रासाठी पक्ष्यांद्वारे उत्सर्जित मैला प्रक्रिया व्यवस्था आहे. इतर प्रक्षेत्रावर मैला साठवण व्यवस्था आहे. सदर पक्ष्यांचा मैला शेतीसाठी खत म्हणून विक्री करण्यात येतो.
व्यक्तिगत कुक्कुट पालकांच्या ५ प्रक्षेत्रावर गादी पध्दतीने मांसल कुक्कुट पालन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रावर साधारणत: ४५ दिवसात बॅच विक्रीस तयार होते. पक्षी विकी नंतर पक्षीघरातील तुस-गादीची विक्री शेतीसाठी खत म्हणून करण्यात येते. पथकास या प्रक्षेत्रांच्या पासून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी होकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी होकारात्मक आलेले आहेत.

नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारार्थी आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.
कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.

कुक्कुट पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये कंम्पायलो बॅक्टर जेजूनाय हा सामान्यत: अस्तित्वात असणारा जिवाणू आहे. तसेच हा जिवाणू इतर प्राणी व मानवांतही आढळतो. ही शास्त्रोक्त माहिती आहे. परिक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रावरील सांडपाणी अथवा विष्ठा नजीकच्या पाणी स्त्रोतात मिसळले नसल्याने काही दूरचित्रवाहिन्या या आजाराचा कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या देत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.

नागरिकांना आवाहन : पावसाळा ऋतुत कॉलरा सारखे आजार दुषित अन्न पाण्यामुळे होतात तसेच कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय जिवाणू आजारास कारणीभूत ठरू शकतात. कच्चे अर्धवट शिजवलेल्या मासांतून हा जिवाणूचा प्रसार होतो. यासाठी पाणी उकलून तसेच ब्लीचिंग पावडरची योग्य मात्रेत प्रक्रिया करुनच पिण्यास वापरावे. भाज्या व मांस स्वच्छ करुन व पुर्ण शिजवूनच सेवन करण्यात यावे. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही-पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!