Homeताज्या बातम्याजयंत पाटील बारामतीत शरद पवारांच्या भेटीला

जयंत पाटील बारामतीत शरद पवारांच्या भेटीला

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा एकीकडे सुरु असतानाच दुसरीकडे शुक्रवारी (दि. १४) अचानक त्यांनी बारामतीत येत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु पवार यांच्यासोबत त्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगांची पाहणी केली. खा. सुप्रिया सुळे या ही त्यांच्यासोबत होत्या.
जयंत पाटील हे पक्षात नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीतील शुक्रवारची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
पाटील यांच्या दौर्याबाबत खा. सुळे म्हणाल्या, किती भाग्य आहे बघा..! की सर्वांनाच असं वाटतं की..! ही व्यक्ती आपल्याकडे हवी..! असे प्रत्येकाला वाटणे हे केवढी मोठी बाब आहे. पाटील हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यावर सुळे म्हणाल्या, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. ‘बुरा ना मानो होली है.’
: जय पवार यांच्या विवाह बंधनाचा आनंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या विवाह बंधनाचे काही फोटो खा. सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवर टाकले. त्याबाबत त्या म्हणाल्या, जय पवार यांचे लग्न ठरतेय याचा आम्हाला आनंद आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी आले होते,असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!