Homeताज्या बातम्याविठ्ठल काटे यांना AISCA “बेस्ट सीनियर ऑफ द ईयर” पुरस्कार प्रदान

विठ्ठल काटे यांना AISCA “बेस्ट सीनियर ऑफ द ईयर” पुरस्कार प्रदान

पुणे 24 तास :

ऑल आयकॉनिक सीनियर सिटिझन्स असोसिएशन (AISCA) यांच्या वतीने देण्यात येणारा “बेस्ट सीनियर ऑफ द ईयर” हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक आणि नवचैतन्य हास्य योग परिवाराचे संस्थापक श्री. विठ्ठल काटे यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सुप्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गौरवपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सुमन काटे यांचाही सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार श्री. काटे यांना देण्यात आला. हास्ययोग, सकारात्मक विचारसरणी आणि समाजाशी जोडलेपण वाढवण्यासाठी त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे अनेक ज्येष्ठांच्या जीवनात आनंद व आशा निर्माण झाली आहे.

पुरस्कार स्वीकारताना श्री. विठ्ठल काटे यांनी AISCA परिवाराचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. “ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धातही सक्रिय, आनंदी आणि समाजाशी जोडलेले राहावे, हाच माझा ध्यास आहे,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या अध्यक्षा शकीला शेख यांनी सत्कारार्थींचे स्वागत केले. AISCA चे सल्लागार सदस्य बी. एल. स्वामी यांनी या पुरस्काराचे उद्दिष्ट स्पष्ट केले तसेच किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन रविंद्र शाळू यांनी केले.

या कार्यक्रमास AISCA चे पदाधिकारी सुनिला कवीटकर, सुहास घोडके, स्मिता वाघ, शीतल वाघ, शीतल स्वंत, फरिदा सय्यद, आशा क्षीरसागर, विजयंता के. डॉ. अनिल कुलकर्णी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी काही सीनिअर डांस ग्रुप्स नी विविध गुणदर्शन सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

error: Content is protected !!