Homeताज्या बातम्याAISCA ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आढावा बैठक उत्साहात संपन्न

AISCA ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आढावा बैठक उत्साहात संपन्न

सुनिला कवीटकर याना AISCA चा बेस्ट सोशल सर्विस एक्सेलेंस अवार्ड

पुणे 24 तास: –

ऑल आयकॉनिक सीनियर सिटिझन्स असोसिएशन (AISCA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आढावा बैठक अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या मागील वर्षातील उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील कार्यक्रम, विस्तार व कार्यपद्धती यावर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी संस्थेच्या वाटचालीत उत्तम योगदान दिल्याबद्दल सुनिला चिंतामणी कवीटकर याना बेस्ट सोशल वर्क एक्सेलेंस अवार्ड प्रदान करण्यात आले.

या बैठकीस संस्थेच्या अध्यक्षा शकीला शेख, दिल्ली AISCA चे डायरेक्टर व सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुभाष ढिंगरा, AISCA चे सल्लागार व गिट्स फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक एम. ए. तेजानी, ज्येष्ठ सल्लागार बी. एल. स्वामी, AISCA चे कमिटी मेंबर तसेच पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, प्राध्यापक रवींद्र शाळू, AISCA च्या कमिटी मेंबर सुनीला कवीटकर यांच्यासह AISCA चे मेंबर सौ. स्मिता वाघ, सौ. शीतल वाघ, सौ. शीतल स्वंत, सौ. फरीदा सय्यद, सौ. आशा क्षीरसागर, विजयंता के., डॉ. अनिल कुलकर्णी, श्री. सुहास घोडके आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली.

अध्यक्षा शकीला शेख,

“ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक, मानसिक व भावनिक आरोग्य जपणे हे AISCA चे प्रमुख उद्दिष्ट आहे. वार्षिक आढावा बैठकीतून आपली वाटचाल तपासून अधिक प्रभावी काम करण्याची दिशा मिळते. येत्या वर्षात आम्ही ज्येष्ठांमध्ये डिजिटल अवेयरनेस प्रोग्रामवर भर देणार असून हजारो ज्येष्ठांना याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. AISCA मधील प्रत्येक सदस्य हा संस्थेचा कणा आहे. सर्वांच्या सक्रिय सहभागातूनच संस्था अधिक सक्षम आणि व्यापक बनेल, असे त्यांनी सांगितले.

सुनीला कवीटकर,

यांनी वार्षिक आढावा घेताना वर्षभरात घेण्यात आलेले उपक्रम आणि त्याचे यश नमूद केले. तसेच पुरस्कार दिल्याबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. सुभाष ढिंगरा,

“AISCA चे कार्य केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून ते ज्येष्ठांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे. ही चळवळ देशपातळीवर अधिक व्यापक झाली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

एम. ए. तेजानी,

“संस्थेच्या वाढीसाठी नियोजन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. AISCA कडे एक सक्षम टीम असल्याने संस्था निश्चितच नवे मापदंड निर्माण करेल,” असे ते म्हणाले.

बी. एल. स्वामी,

“AISCA ही संस्था नसून एक विचार आहे. ज्येष्ठांना आपलेपणाची भावना देणारे हे व्यासपीठ समाजासाठी आदर्श ठरत आहे,” असे त्यांनी सांगितले.

किशोर सरपोतदार,

“ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणे ही काळाची गरज आहे. AISCA हे काम अत्यंत प्रभावीपणे करत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

प्रा. रवींद्र शाळू, यांनी ओघवत्या शैलीमध्ये सर्वांचे आभार मानले.

“आढावा बैठकीतून आत्मपरीक्षण होते. संस्थेची वैचारिक बैठक मजबूत असल्यामुळे AISCA चे कार्य अधिक परिणामकारक ठरत आहे,” असे त्यांनी सांगितले.

विजय के यांनी वर्ष २०२४/२५ या सालाच्या वार्षिक जमाखर्च तथा खर्चाचा तपशील तसेच येत्या आर्थिक वर्षाचे नियोजनाचा अहवाल सादर केला.

एकूणच  बैठकीदरम्यान विविध सूचना, नवीन उपक्रम, सदस्यवाढ, सामाजिक जबाबदारी तसेच पुढील वर्षातील कार्यक्रमांबाबत सकारात्मक व सखोल चर्चा झाली. उपस्थित सदस्यांनी AISCA च्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेसोबत अधिक सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

AISCA ची ही वार्षिक सर्वसाधारण सभा व आढावा बैठक उत्साह, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

0
कॅम्पमध्ये रामदास आठवले यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विरवाणी प्लाझा...

पाचशे “नियमबाह्य वृक्षतोड प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेसमोर आंदोलन”

0
ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कोलते-पाटील डेव्हलपर्स (kolte-Patil Developers) आणि बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) या दोन अर्जदारांनी खाजगी जागेतील झाडे तोडण्यासाठी अर्ज केले होते,...

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

0
विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली   पुणे : मोहिनी मोहिते, संपादक मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण...

error: Content is protected !!