Homeताज्या बातम्याखडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे वेगाने सुरू, काम एक किलोमीटर पूर्ण, बुमरच्या माध्यमातून...

खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे वेगाने सुरू, काम एक किलोमीटर पूर्ण, बुमरच्या माध्यमातून एकाच वेळी चार ठिकाणी खोदाई

खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे वेगाने सुरू, काम एक किलोमीटर पूर्ण, बुमरच्या माध्यमातून एकाच वेळी चार ठिकाणी खोदाई

पुणे : खडकवासला धरणाच्या कालव्यातील पाण्याची होणारी गळती चोरी, जलप्रदूषण तसेच बाष्पीभवन रोखण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणी एकाच वेळी चार टनेल बेअरिंग मशीनच्या माध्यमातून (बुमर) बोगदा खोदण्याचे काम सुरू असून गेल्या दोन महिन्यांत सुमारे एक किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बुमरच्या माध्यमातून दिवसामध्ये आठ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. आणखी तीन ठिकाणाहून लवकरच कामास सुरूवात करण्यात येणार आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम ‘मेघा इंजिनीअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून मान्यता मिळाल्याने जागेवर कामाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरूवात झाली असून आतापर्यंत एक किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत तीन वर्षांची असणार आहे.

बुमर मशीनच्या साहाय्याने ६.३ डायमीटर ‘डी’ आकाराच्या बोगदा खोदण्यात येत आहे. काम गतीने होण्यासाठी एकाचवेळी चार ठिकाणाहून बोगदा खोदण्यात येत आहे. लवकरच कात्रज, वडकी आणि लोणी काळभोर येथूनही बोगद्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रती सेकंद ४१ क्युसेक (क्युबीक मीटर) पाणी सोडण्यात येणार आहे. तर धरणाच्या भिंतीपासून मागील बाजूस ९० मीटर अंतरावर आणि जलाशयाच्या खालील बाजूस १८ मीटर खोलीवरून हा बोगदा जाणार आहे. त्यामुळे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. परिणामी पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होणार आहे.

———

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

0
कॅम्पमध्ये रामदास आठवले यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विरवाणी प्लाझा...

पाचशे “नियमबाह्य वृक्षतोड प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेसमोर आंदोलन”

0
ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कोलते-पाटील डेव्हलपर्स (kolte-Patil Developers) आणि बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) या दोन अर्जदारांनी खाजगी जागेतील झाडे तोडण्यासाठी अर्ज केले होते,...

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

0
विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली   पुणे : मोहिनी मोहिते, संपादक मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण...

error: Content is protected !!