Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यारस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व...

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व परवाना रद्द- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अनधिकृत होर्डिंगवर २१ दिवसांची नोटीस; घाट मार्गांवर लेन ओलांडण्यास प्रतिबंध आणि साईन बोर्ड लावण्याच्या सूचना

पुणे, दि. १२:  – जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातग्रस्त (ब्लॅकस्पॉट) भागांवर तातडीने उपाययोजना राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करून परवाने रद्द करणे तसेच अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी २१ दिवसांची नोटीस देऊन कारवाई करणे, यासह घाट मार्गांवर लेन ओलांडण्यास प्रतिबंध घालण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वपनील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहूल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. दंड न भरणाऱ्या वाहनधारकांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करावी. आतापर्यंत सुमारे तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. वाहतूक कोंडीमागे नियमांचे उल्लंघन हे एक प्रमुख कारण असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात वार्षिक ९०० पेक्षा अधिक अपघाती मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ब्लॅकस्पॉटचे सखोल सर्वेक्षण करून तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

मागे झालेल्या बैठकीतील सूचनांनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण पूर्ण केले असून ४२ ब्लॅक स्पॉट होते त्यातील १५ ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम सुरु आहे. उर्वरित ब्लॅक स्पॉट काढण्याची संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. हिंजेवाडी व चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यातील एमएसआरडीसी, एनएचआय व सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी. संबंधितांना २१ दिवसांची नोटीस देऊन त्यानंतर उर्वरित होर्डिंग काढून टाकावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच घाट मार्गांवर वाहनांनी लेन ओलांडून पुढे जाण्यास प्रतिबंध घालून आवश्यक तेथे साईन बोर्ड व चेतावणी फलक लावावेत. शक्यतोवर मुख्य रस्त्यावर गतिरोधक करु नयेत, धोकादायक जनक्शन असल्यास अप्रोच/दुय्यम रस्त्यावर इंडियन रोड कॉग्रेस प्रमाणे गतिरोधक व चिन्हानकन करावे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या धर्तीवर इंडियन रोड कॉग्रेसच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे स्मूथ गतीरोधक असावेत. मुख्य रस्त्याला पांढऱ्या पट्ट्या, दिशादर्शक फलक लावावेत.

नवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी समितीमार्फत आयआयटी दिल्लीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार आयआयटीचे पथक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,पोलीस विभाग, महानगरपालिकांचे अधिकारी मिळून सोमवारी भेट देवून पाहणी करावी. यावेळी पत्रकार, नागरिकांनी आपल्या सूचना कराव्यात, असे आवाहन  डुडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!