Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याभूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीचा काम बंदचा इशारा!

भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीचा काम बंदचा इशारा!

दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात आश्वासन पाळले नसल्याने उचलले पाऊल

पुणे: तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, सुधारित आकृतीबंध, विभागाचे खाजगीकरणाला विरोध यासह इतर मागण्यांसाठी भूमी अभिलेख कृती समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, अप्पर मुख्य सचिव यांच्यासह जमाबंदी आयुक्त यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी विविध संघटनांच्या वतीने सनदशीर मार्गाने लढा उभारला आहे. प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, नागपूर खंडपीठाचे मूळ अर्ज क्रमांक ४३६/२०१७ पवनकुमार केवटे व इतर ९८ मधील दिनांक १४/०१/२०२० चे आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत ४ जून २०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता दीडशे दिवसांचा कालावधी उलटूनही तीन महिने झाले आहेत. तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत.

भूमी अभिलेख विभाग व शासन स्तरावर केवळ वेळकाढूपणा करून कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांवर गदा आणण्याचे व दबावतंत्राचा वापर करून काम सुरू आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने व आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारण्यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत भूमी अभिलेख कृती समितीची स्थापना केली आहे. या कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जमाबंदी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार

कृती समिती आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून व काळ्या फिती लावून केवळ कार्यालयीन कामकाज करणार आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून कामबंद ठेवून काळ्या फिती लावून निषेध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास दि. २ मार्च २०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

अशा आहेत प्रलंबित मागण्या

मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवासभत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ट करावा. इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली अथवा प्रतिनियुक्ती करू नये. विभागाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करावा. अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर नियुक्ती प्राधिकारी यांचे परवानगी व चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची पद्धत बंद करावी. शासकीय सुटीचे दिवशी अपवाद वगळता कोणतेही कामकाज करण्यात येवू नये. अतिरिक्त कामकाज केल्यास त्याचा मोबदला नियमानुसार देण्यात यावा, यासह जमाबंदी आयुक्त कार्यालयातील उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांची पुणे विभागाबाहेर बदली करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर भूमी अभिलेख कृती समितीचे पदाधिकारी सुनील गोडसे, विभूतीचंद्र गजभिये, पवन केवटे, राहुल पाटील, किशोर इंगळे, दीपाली मुरकुटे, सूरज रामटेके, विवेक कोठाळे, कमलाकर पोतदार, संजय बोर्डे, अभय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा पाठिंबा

दरम्यान, कृती समितीच्या या आंदोलनाला कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. याबरोबरच संघटना २ मार्च २०२६ पासून पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आर. एम. कांबळे, मुख्य संघटन सचिव नुपम मेढे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!