पुणे २४ तास :- वर्षभराच्या मेहनतीनंतर संधी शोधून मोठी स्वप्न बघावीत. संधी मिळाल्यावरच आपले ध्येय साध्य होऊ शकते, असे प्रमुख पाहुणे राज देशमुख यांनी अर्हम फाउंडेशनच्या कार्यक्रमात सांगितले.
अर्हम फाउंडेशनच्या अर्हम कला व वाणिज्य, अर्हम विधी, अर्हम कनिष्ठ, अर्हम माहिती तंत्रज्ञान आणि अर्हम एट्रिपलआयएस महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलन व बक्षीससमारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ सुदाम शेळके, क्रीडासंचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शैलेश पगारिया, सचिव डॉ आतिश चोरडिया, खजिनदार श्रीकांत पगारिया, आयटी प्रमुख स्वराज पगारिया, प्राचार्य डॉ सतीश भोसले, डॉ मेहबुबसाब नगरबावडी, डॉ नेहा पाटील, डॉ अमन मिश्रा, प्राचार्या प्रभा बटवाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्या प्रभा बटवाल यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉ नेहा पाटील यांनी अर्हम फाउंडेशन व महाविद्यालयांचे तपशीलवार माहिती दिली. कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच, प्राचार्य डॉ सतीश भोसले यांचा सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ सुदाम शेळके म्हणाले की, खेळातून कुशलता साधता येते आणि शैक्षणिक करिअर करताना खेळाचे महत्त्व लक्षात ठेवावे. त्यांनी विद्यार्थ्यांना सुचवले की भविष्यात कोणतीही संधी गमावू नये आणि प्रत्येक संधीचा पूर्ण उपयोग करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह

























