Homeउद्योगआगीमुळे 400 के व्ही टॉवर लाईनला ट्रीपिंग

आगीमुळे 400 के व्ही टॉवर लाईनला ट्रीपिंग

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,

पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये शनिवारी (दि. १५) दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी ३४६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्याने स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन महावितरणच्या ८० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी गाव व भोसरी एमआयडीसी, मंचर ग्रामीण परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राबाहेर अदानीच्या कार्यक्षेत्रातील ४०० केव्ही टॉवर लाइनखाली अज्ञाताने गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला आज दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी तब्बल ३४६ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्हीसह चाकण, चिंचवड, भोसरी, ब्रीज स्टोन, थेऊर आणि काठापूर या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरणच्या ८० उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, सांगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोली, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे, सारा सिटी, आळंदी फाटा, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. यासह पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, जय गणेश साम्राज्य, किवळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, निगडी, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, ब्लॉक जे, क्यू, एस, ईएल, टी, जनरल ब्लॉक, मंचरचा ग्रामीण परिसर, नारायणगावचा पूर्व परिसर, केसनंदआव्हाळवाडीपेरणेथेऊरवडतीकुंजीरवाडीलोणी काळभोरसोरतापवाडीफुरसुंगीउरुळी देवाची आदी परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी ३.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत तासभर बंद होता.  

तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये पीजीसीआयएल अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर टॉवर लाइनखालीच गवत पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या गवताच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ही आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!