Homeपुणेइंग्रजीबरोबर आता इतर भाषा अवगत करण्याची गरज- विष्णू वाडकर

इंग्रजीबरोबर आता इतर भाषा अवगत करण्याची गरज- विष्णू वाडकर

रायजिंग स्टार स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेबरोबर इतरही भाषा अवगत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नवनव्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. पालकांनी पाल्यासाठी वेळ दिला पाहिजे, चांगले संस्कार ही मोठी शिदोरी आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक विष्णू वाडकर यांनी व्यक्त केले.

मोरेवस्ती (मांजरी बु।।, ता. हवेली) येथील रायजिंग स्टार स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन बंकापुरे, पोलीस निरीक्षक विष्णू वाडकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे, प्रा. नामदेव बुतेकर, ज्येष्ठ साहित्यिक सतीश कुमदाळे, पालक-विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका योगेश्वरी कुमदाळे यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन बंकापुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांबरोबर समाज घडविण्याचे पवित्र काम शिक्षकांकडून केले जात आहे. नव्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांकडून ज्ञानदानाचे कार्य केले जात आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. रायजिंग स्टार स्कूलमध्ये फक्त विद्यार्थी नाही तर समाज घडविण्याचे काम सुरू आहे. पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन करून मुलांच्या बौद्धिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक सतीश कुमदाळे यांनी खेळाचे महत्व विशद करून शिक्षक आणि पालकांचे विद्यार्थ्याप्रती कर्तव्य स्पष्ट केले .
विद्या कुंभार यांनी सूत्रसंचालन केले,
अनिता क्षीरसागर, अरुणा बिरादार, स्वरूपा कंचे, सुवर्णा सोनवणे, विद्युलता कुंभार, सारिका चटाले, कादंबरी सणस, विपा जोशी, शीतल म्हेत्रे, अंबिका घोष, स्वाती गोरे, कल्याणी जडे, जयश्री तनशाळे, ज्योत्स्ना गायकवाड, मीनल कोकील, रूपाली दळवे, श्रुती कांदे, सविता शिंदे, मेघा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!