Homeताज्या बातम्याकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला विमान चालविण्याचा अनुभव

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला विमान चालविण्याचा अनुभव

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

देशाच्या नागरी विमान वाहतूक खात्याचा कारभार दिल्लीपासून सांभाळणारे आणि पुण्यातील गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वतः पायलट होऊन थेट विमानच चालवून उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

मोहोळ यांनी प्रशिक्षणार्थी पायलटकडून विमानाच्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली आणि काही वेळातच “तयार है हम!” या आत्मविश्वासात भरून थेट विमान चालवले. आकाशात झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आत्मविश्वास याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंत्री मोहोळ यांनी विमान आकाशात टेक ऑफ करताच विमानातील उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

हा प्रसंग पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी होता — कारण एखादा मंत्री केवळ फाईलांपुरता मर्यादित न राहता, क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास उत्सुक असल्याचे दर्शन त्यातून घडले. दिल्लीतील कारभार सांभाळत असताना मोहोळ यांनी पुण्यावरील लक्ष थोडे ही कमी केलेले नाही. उलट पुणेकरांसाठी काय करता येईल याचा विचार ते नेहमी करताना दिसतात.

बाणेर येथील ‘यो स्काईज एव्हीएशन’ प्रशिक्षण इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘एअरबस A320’ फ्लाइट सिम्युलेटरचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विमान चालविण्याचा अनुभव घेतला. हे इन्स्टिट्यूट हवाई क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे, अशांसाठी ही संस्था प्रशिक्षण देणार आहे.

या प्रसंगी ‘यो स्काईज’चे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृष्णकुमार गोयल, विजय भंडारी, प्रवीण बढेकर, राजेंद्र जैन, राजेंद्र मुथा, मोतीलाल सांकला, .सनी सांकला, श्री. सुनील नहार, उमेश जोशी, डॉ. रवी चिटणीस, डॉ. मनोज तरांबळे, यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट आदींसह मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!