Saturday, August 29, 2026
spot_img
Homeमनोरंजनदेशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे व्यंगचित्र दाखवतं- नागराज मंजुळे

देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे व्यंगचित्र दाखवतं- नागराज मंजुळे

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं. त्याला कोणताही फिल्टर नसतो, म्हणून ते प्रभावी ठरतं. व्यक्ती असो वा समाज त्याला व्यंगचित्राची गरज आहे, असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे यांनी केलं. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

सुप्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार मंजुल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, आम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. जो कोणी चमत्काराला नमस्कार करतो, त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणी नेता आपण अजैविक असल्याचा दावा करतो, त्यावर आम्ही व्यंगचित्रातुन प्रश्न विचारतो.

सा. मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव हे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे संयोजक आहेत. त्यांनी आपल्या मनोगतात त्यांचा सनातनी विचारांपासून ते महा. अंनिस पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले. ते म्हणाले, फुले-शाहू- आंबेडकर ते दाभोलकरां पर्यंतचे विचार हे अंधश्रद्धेविरूद्धची लस आहे, ती फक्त आपल्याला सर्वत्र न्यायची आहे.

पटकथा लेखक अरविंद जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि व्यंगचित्रकार यांच्यातील उमद्या संवादाची उदाहरणे दिली. राजकारणी नेते व व्यंगचित्रकार याचं बोलणं होईल असा काळ पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आर्डे यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ,मिलिंद देशमुख,संजय मालती कमलाकर, श्रीराम नलावडे, अरविंद पाखले, दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सौरभ बागडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

…………………

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!