Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत केवळ 30 कोटी शिल्लक

पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत केवळ 30 कोटी शिल्लक

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्हा परिषदेच्या तिजोरीत सध्या अवघे २९ कोटी ७५ लाख  रुपये शिल्लक राहिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला आगामी आर्थिक वर्षासाठीचा (२०२५-२६) २९२ कोटी कोटी ७५ लाख रुपयांचा जमेचा मूळ अर्थसंकल्प मंजूर करावा लागला आहे. सलग पाचव्यांदा जमेचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची वेळ पुणे जिल्हा परिषदेवर आली आहे. झेडपीच्या कार्यक्षेत्रातील मालदार समजली जाणारी गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा आणि जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे असलेली हक्काची थकबाकी वेळेत न मिळाल्याचा जोरदार फटका या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला बसल्याचे दिसून आले आहे. 

आगामी वर्षाच्या (सन २०२५-२६)अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, बांधकाम आदी विभागांसाठी पुरेशी  तरतूद करण्यात आली आहे. किरकोळ दुरुस्त्या व त्रुटींच्या पुर्ततेसह बुधवारी (ता.१९) हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूर  केला. चालू आर्थिक वर्षाचा (सन २०२४-२५) ४१० कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्पालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. 

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील  यांनी बुधवारी (ता. १९ मार्च) आगामी आर्थिक वर्षाचा (२०२५-२६) मूळ अर्थसंकल्प सादर केला.  दरम्यान, या सर्वसाधारण सभेत चालू आर्थिक वर्षाचा (२०२४-२५) ४१० कोटी रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्पही सादर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आरंभीची शिल्लक रक्कम २९ कोटी ७५ लाख रुपयांची आहे. शिवाय २६३ कोटी रुपयांचा जमेचा अंदाज गृहित धरण्यात आला आहे.

प्रमुख योजनांसाठी अर्थसंकल्पातील प्रस्तावित तरतूद (रुपयांत) 

– ग्रामपंचायतींना सोलर रूफ टॉप बसविणे — १ कोटी

– ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीमध्ये सोलर हायमास्ट दिवे बसविणे —- १ कोटी ५० लाख 

– शैक्षणीक गुणवत्ता विकास कार्यक्रम —- १ कोटी

– जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरण कार्यक्रम —-  ११ कोटी २५ लाख

– नैसर्गीक आपत्तीने नुकसान झालेल्या शाळांची दुरूस्ती —- ७५ लाख 

– जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोक्याच्या जागांना तार किंवा वॉल कंपाऊंड करणे —- १ कोटी १५ लाख 

– प्राथमिक आरोग्य  केंद्र व उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती —- ५ कोटी २० लाख 

– शेतकऱ्यांना शेतीसाठी सुधारित औजारे व साहित्य पुरविणे —- ४ कोटी

– पशुवैद्यकिय दवाखान्यांना साधन सामुग्री पुरवठा करणे —- १ कोटी ५० लाख

– यशवंत निवारा योजना —- १ कोटी

– मागासवर्गीयांना जीवनोपयोगी वव्यवसायाभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे —- ३ कोटी

– मागासवर्गीय वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध करून देणे —- १० कोटी

– मागासवर्गीय वस्त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी पाणीपुरवठा करणे  व समाजमंदिर दुरूस्ती —- ६ कोटी

– मागासवर्गीय वस्त्यांमध्ये सोलर दिवे बसविणे (ऑन ग्रीड) —- १ कोटी ५० लाख 

– कुपोषित मुलां-मुलींसाठी, गर्भवती व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार पुरवठा करणे — ४ कोटी

– अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रम —- ६ कोटी

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

– आरंभीची शिल्लक —- २९ कोटी ७५ लाख रुपये 

– सन २०२५-२६ मधील जमेचा अपेक्षित अंदाज —- २६३ कोटी रुपये

– सन २०२५-२६ साठीचा एकूण जमेचा अर्थसंकल्प —- २९२ कोटी ७५ लाख रुपये 

– सन २०२५-२६ चे खर्चाचे मूळ अंदाजपत्रक —-   २९२ कोटी रुपये

– जिल्हा परिषद योजना खर्चाचे मूळ अंदाजपत्रक —- १७७ कोटी ५० लाख रुपये 

– सन २०२५-२६ च्या मूळ अंदाजपत्रकात ठराविक जमेच्या बाजूच्या २० टक्के म्हणजेच २४ कोटी २६ लाख रुपयांची सामाजिक न्याय विभागासाठी तरतूद.

– दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के म्हणजेच ८ कोटी रुपयांची तरतूद. 

– महिला व बालकल्याणसाठी ठराविक जमेच्या बाजू च्या १० टक्के म्हणजेच १२ कोटी लाख रुपयांची तरतूद 

– पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्तीसाठी ठराविक जमेच्या बाजूच्या २० टक्के म्हणजेच ६५ लाख रुपयांची तरतूद

पुणे जिल्हा परिषदेची मागील सुमारे ७ वर्षांची   मुद्रांक शुल्क अनुदानाची मोठी थकबाकी सरकारकडे  होती. यापैकी काही रक्कम प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. यामुळे झेडपीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आणखी ४५० कोटी रुपयांची  मुद्रांक शुल्क अनुदानाची थकबाकी आहे. ही थकबाकी प्राप्त करून घेण्यासाठी पत्रव्यवहार सूरू आहे. याशिवाय पाणीपट्टी उपकर, थकीत पाणीपट्टी उपकर, कृष्णा खोरे विकास महामंडळकडील  ५० ते ६० कोटी रुपयांची थकबाकी प्राप्त करून घेण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्यामध्ये आहे. या  दोन्ही थकित रक्कमा पुढील आर्थिक वर्षात प्राप्त करून घेण्यात येणार आहेत.यामुळे  जिल्हा परिषदेचा भरीव तरतुद असलेला अर्थसंकल्प सादर केला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा व जिल्ह्याचा विकास होणार आहे.   

    — गजानन पाटील,
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!