Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 550 कोटी कर्ज वाटप

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 550 कोटी कर्ज वाटप

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आज अखेरपर्यंत ( दि.२३)  एकूण ५५१ कोटी ५९ लाख ९२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्ज वाटपाचा जिल्ह्यातील ६८ हजार १० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. 

रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना  कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ८०.४४ टक्के इतके पूर्ण झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेच्या वतीने प्रत्येकी कमाल ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्यात येते. जिल्हा बॅंकेच्यावतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत होते. मात्र मागील तीन वर्षापुर्वी  केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केलेली आहे. त्यामुळे शून्य टक्के व्याजाची ही योजना गोत्यात आली होती. परंतु राज्य सरकारच्या सुचनेनुसार या अर्धा  टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे. 
 
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने ६८५ कोटी ७३  लाख  रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंतचे आहे. एकूण उद्दिष्टांपैकी आतापर्यंत यापैकी ८०.४४ टक्के  उद्दिष्ट  पूर्ण झाले असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज दृष्टीक्षेपात…

रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट —  ६८५ कोटी ७३ लाख रुपये
आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप — ५५१ कोटी ५९  लाख ९२  हजार रुपये
पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी — ६८ हजार १० 
पीक कर्जाचा लाभ झालेले शेतीचे एकूण क्षेत्र — ४८ हजार ९७५ हेक्टर
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरचे वाटप — ५७९ कोटी ७९ लाख ०१ हजार रुपये

पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण दोन हजार ७२४ कोटी ६६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खरिपासाठीचे उद्दिष्ट हे २ हजार ४३ कोटी ४३ हजार रुपयांचे आहे. या पीक कर्ज वाटप उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही पात्र शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅंक सातत्याने घेत आहे.

– प्रा. डॉ .दिगंबर दुर्गाडे,
अध्यक्ष,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!