Monday, October 19, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त

राजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात पकडले. त्याच्याकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. नाथूराम जीवनराम जाट (वय ५२, रा. असावरी, जि. नागोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाट याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागातील अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाारी गस्त घालत होते. त्या वेळी जाट तेथून निघाला होता. त्याच्याकडे पिशवी होती. पोलिसांच्या पथकाने संशयावरुन त्याची चौकशी केली. पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत अफू सापडली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, दयानंद तेलंगे पाटील, संदीप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली.
झटपट पैसे कमाविण्यासाठी अफू विक्री
आरोपी नाथूराम जाट मूळचा राजस्थानातील आहे. तो पूर्वी फर्निचरचे काम करायचा. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू विक्रीस आणली होती. त्याने आतापर्यंत कोणाला अफू विक्री केली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!