Wednesday, October 14, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीरहिंगणघाट बाजार समिती राज्यात प्रथम; बारामती तिसऱ्या...

राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीरहिंगणघाट बाजार समिती राज्यात प्रथम; बारामती तिसऱ्या स्थानी

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार राज्यातील १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीनुसार राज्यात पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती १७८ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समिती १७१.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, बारामती १६५ गुणांसह तिसऱ्या स्थानी, १५५.५ गुणासह पंढरपूर पाचव्या तर १४९ गुण मिळवून अकलूज आठव्या स्थानावर आहे. तसेच राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार विभागातील बारामती, पंढरपूर व अकलूज हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर आहेत.

बाजार समित्यांची तसेच खाजगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सुचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्र म राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. बाजार समित्यांच्या निकषासाठी २०० गुण व खाजगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.

या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये तसेच खाजगी बाजारांमध्ये आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांनी अधिक जोमाने कामकाज करावे, असे आवाहन पणन संचालक विकास रसाळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!