-15 दिवसांत 25 हजार 625 अर्ज भरले
पुणे: (पुणे 24 तास ब्युरो )
समाज कल्याण विभागाचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ काही दिवसांपासून स्लो होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी संकेतस्थळ सुरू आहे. ही समस्या आधार लिंक शी निगडीत आहे. आधार साईट वर काही समस्या उद्भवल्यास फॉर्म पुढे सबमिट होण्यास काही अडचणी निर्माण होत असतील तर तो आधार साईटमुळे समस्या निर्माण झाली असेल. मात्र राज्य शासनाची ही डीबीटी सुविधा सुरळीत सुरू असून आत्तापर्यंत ( दि.1 ते 18 ) फेब्रुवारी पर्यंत 25 हजार 625 फॉर्म विद्यार्थ्यांनी भरले आहेत अशी माहिती सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाची ही दरवर्षीची अडचण आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले जाते. परंतु, अनेकदा संकेतस्थळावर अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. यावर्षी ही कही समस्या निर्माण झाली होती मात्र ती सध्या सुरळीत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
–वेळेत अर्ज करणे आवश्यक
विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६० टक्के तर राज्य सरकारकडून ४० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती कधीच वेळेत मिळत नाही अशी ओरड असते. परंतु, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावरही वेळेत अर्ज केले जात नसल्याने शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
—-
कोट
अर्ज करणे सुरळीत चालू आहे. मात्र आधार कार्डाची डीबीटी संकेतस्थळ लिंक असल्याने आधार कार्ड वरच्या समस्या निर्माण झाल्या असल्याने पुढील प्रोसेस संत गतीने होत असेल मात्र पंधरा दिवसात 25 हजार 625 अर्ज भरण्यात आले आहेत. तर सरकार कडून राज्याचा ३८४ कोटी मंजूर झाले आहेत. ते लवकरच विद्यार्थाच्या खात्यात जमा केली जाईल.
-प्रमोद जाधव,सह आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे
—

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























