पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)
हडपसर मगरपट्टामध्ये ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आले. याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागातील भोसले गार्डन परिसरात राहायला आहेत. २२ जानेवारी रोजी त्या वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये निघाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाजवळ त्या रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. यावेळी महादेव मंदिराजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील ४२ हजारांचे सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवलेले पाकिट असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कर्वेनगर, कोथरुड भागात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलाकंडील दागिने चोरुन नेण्याच्या घटना नुकतीच घडली.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























