Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगइस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत २४ जानेवारी रोजी शिबाराचे आयोजन

इस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत २४ जानेवारी रोजी शिबाराचे आयोजन

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत वैद्यकीय  क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्राईल देशात ‘घरगुती सहायक’ या पदाकरीता रोजगाराची संधी उपलब्ध आहे: इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली आहे.

या शिबीरात उमेदवारांना इस्राईल येथील आरोग्य क्षेत्रातील संधींबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या अर्जाबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार संधींचा लाभ घेण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामध्ये आयोजित कॅम्पमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.

रोजगार संधींचा लाभ घेण्याकरीता २५ ते ४५ वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार पात्र असून यासोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम / जीएनएम / बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान ३ वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा/तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या काम करत असू नयेत किंवा इस्राईल देशाचे रहिवासी नसावेत.

अधिक माहितीकरीता https://maharashtrainternational.com या या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हयातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग महाविद्यालये व संबंधित संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिकाधिक उमेदवारांपर्यंत या शिबीरास उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!