Friday, August 14, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेमहापुरावर उपाय की केवळ आश्वासन? पुण्याच्या नद्यांसाठी ‘वैज्ञानिक हस्तक्षेपाचा’ दावा

महापुरावर उपाय की केवळ आश्वासन? पुण्याच्या नद्यांसाठी ‘वैज्ञानिक हस्तक्षेपाचा’ दावा

पुणे २४तास ः- शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे संवर्धन करताना केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) वैज्ञानिक मार्गदर्शनाचा आधार घेतला जाणार आहे. वाढती लोकसंख्या, पाण्याची गळती, सांडपाणी आणि पावसाळ्यातील अतिवृष्टी—या साऱ्या प्रश्नांच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यासाठी महापुराचा धोका कमी करण्याचे ठोस उपाय राबवले जातील, अशी ग्वाही महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्रात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पुणे शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, पाण्याची गळती कमी करणे, भविष्यातील पाणीटंचाई टाळणे आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या महापुराचा धोका कमी करणे, या उद्देशाने महापालिका बहुआयामी उपाययोजना राबवणार असल्याचे राम यांनी सांगितले.

मुळा–मुठा नदीसुधार योजनेच्या अंमलबजावणीत केवळ मुख्य नदी नव्हे, तर ओढे आणि उपनद्यांचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “मुख्य नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम न होता नियोजन केले जाईल. शहरातील कोणत्याही भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाईल,” असेही राम म्हणाले.

नदी स्वच्छता आणि ग्रीन स्पेस वाढविण्यासाठी महापालिका आणि सीडब्ल्यूपीआरएस यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्या माध्यमातून दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. मात्र, पुणेकरांनी यापूर्वीही अनेकदा नदीसुधार आणि पूरनियंत्रणाबाबत अशीच आश्वासने ऐकलेली असल्याने, ही घोषणा प्रत्यक्षात कशी उतरते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

कार्यशाळेत बोलताना सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ. प्रभातचंद्र यांनी नदी व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक अंगावर प्रकाश टाकला. पावसाळ्यापूर्वी आणि नंतर नदीपाण्याची गुणवत्ता, प्रवाहाची क्षमता, आवश्यक प्राणवायूची पातळी, पर्यावरणीय संतुलन तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची गरज यांचा सविस्तर अभ्यास अहवालात समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात पूर ही नैसर्गिक आपत्तीपेक्षा मानवनिर्मित समस्या अधिक ठरत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. अशा पार्श्वभूमीवर, वैज्ञानिक संस्थांच्या सल्ल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. प्रश्न इतकाच आहे—ही प्रक्रिया कागदावर मर्यादित राहणार की प्रत्यक्ष नदीपात्रात तिचा परिणाम दिसणार?

पुण्याच्या भविष्यातील पाणी-सुरक्षेचा आणि पूरधोका नियंत्रणाचा कस या निर्णयांच्या अंमलबजावणीवरच लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

टिंबर मार्केट कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छतेचा दावा फक्त कागदावर?

0
कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे : टिंबर मार्केट परिसरात...

error: Content is protected !!