Homeताज्या बातम्या४०० फूट दरीत कोसळले लष्कराचे वाहन; १० जवान शहीद, ११ गंभीर जखमी

४०० फूट दरीत कोसळले लष्कराचे वाहन; १० जवान शहीद, ११ गंभीर जखमी

जम्मू-काश्मीर- २४ तास – कर्तव्य बजावत असताना आलेल्या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या १० जवानांना वीरमरण आले असून ११ जवान गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भद्रवाह–चंबा मार्गावर खन्नी टॉपजवळ लष्कराचे वाहन ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला.

गुरुवारी सकाळी लष्कराची एक तुकडी ऑपरेशनल ड्युटीसाठी रवाना झाली असताना, अत्यंत दुर्गम आणि अरुंद वळणावर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन थेट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की १० जवानांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि लष्कराच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दरीची खोली यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. ढिगाऱ्यातून ११ गंभीर जखमी जवानांना बाहेर काढण्यात यश आले.

जखमी जवानांना प्रथम भद्रवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेवर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘एक्स’ (माजी ट्विटर)वरील संदेशात त्यांनी म्हटले आहे की, “डोडा येथील रस्ते अपघातात आपल्या १० वीर जवानांचे प्राण गेले, ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. देशासाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.”

शहीद जवान

जोबन जीत, सुधेर नरवाल, मोनू, मोहित, एच. आर. कंवर, सिमरन, पी. लोरा, सुलिंदर, अजय लोफरा, स्वर्ण नाग पाल.

जखमी जवान

साहिल, जे. पी. सिंह, नीरज, अनूप, नागिस, अमन, शंकर, संदीप, जोबनप्रीत, राकेश, अभिमन्यु.

कर्तव्य बजावताना प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानांच्या बलिदानाने देश हळहळला असून, त्यांच्या स्मृतींना संपूर्ण राष्ट्राने आदरांजली वाहिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या 'वाणी' समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची...

error: Content is protected !!