HomeSRAसोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.

पुणे : ऑल शीख शिकलीकर असोसिएशन ‘आशा’चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच पीएमसी व पीडब्ल्यूडीचे कंत्राटदार उद्योगपती बच्चनसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी त्यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याणी म्हणाले की, ते गेली २५ वर्षे उद्योग-व्यवसाय करत असून रामटेकडी, हडपसर तसेच महाराष्ट्रात शीख शिकलीकर व सर्वधर्मीय समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. असे असताना त्यांच्या नात्यातील मलखेसिंग दुधाणी व त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर रील टाकून कल्याणी कुटुंबाची नाहक बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला. तसेच यापूर्वी दुधाणी कुटुंबाने आपली वाहने जाळून नुकसान केल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बच्चनसिंग कल्याणी, बॉबीसिंग बच्चनसिंग कल्याणी आणि शिस्तोलसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी केली. यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

0
कॅम्पमध्ये रामदास आठवले यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विरवाणी प्लाझा...

पाचशे “नियमबाह्य वृक्षतोड प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेसमोर आंदोलन”

0
ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कोलते-पाटील डेव्हलपर्स (kolte-Patil Developers) आणि बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) या दोन अर्जदारांनी खाजगी जागेतील झाडे तोडण्यासाठी अर्ज केले होते,...

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

0
विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली   पुणे : मोहिनी मोहिते, संपादक मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण...

error: Content is protected !!