Homeताज्या बातम्याराज्याच्या रेडीरेकनर दरात ३.८९ टक्के वाढपुणे मनपाच्या दरात ४.१६ टक्के, तर पिंपरी...

राज्याच्या रेडीरेकनर दरात ३.८९ टक्के वाढपुणे मनपाच्या दरात ४.१६ टक्के, तर पिंपरी चिंचवड मनपाच्या दरात ६.६९ टक्के वाढ

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
राज्यातील जमिनीच्या रेडीरेकनर दरात २०२५-२६ वर्षासाठी सरासरी ३.८९ टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणे मनपाच्या हद्दीतील रेडीरेकनर दरात ४.१६ टक्के, तर पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रेडीरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ झाली आहे. रेडीरेकनर दराची अंंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येईल. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी ही माहिती सोमवारी जाहीर केली.
राज्याच्या रेडीरेकनर दरात २०२२-२३ मध्ये सरासरी ४.८१ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर, दोन वर्षे रेडीरेकनर दर कायम ठेवण्यात आले होते. यावर्षी दहा टक्के वाढ होईल, अशी चर्चा होती. तर, जगभरातील आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर रेडीरेकनर दर वाढून नयेत, अशी बांधकाम व्यावसायिक क्षेत्राची मागणी होती.
मुंवई मनपामध्ये ३.३९ टक्के वाढ
बिनवडे म्हणाले, जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या दरम्यान झालेले दस्त, विकसकांच्या जाहिराती, जमीन आणि सदनिकांची दस्त नोंदणी या सर्व बाबी विचारात घेऊन रेडीरेकनर तयार केले जातात. ग्रामीण क्षेत्रात ३.३६ टक्के, महापालिका हद्दीलगतच्या प्रभाव क्षेत्रात ३.२९ टक्के, नगरपरिषद क्षेत्रात ४.९७ टक्के, मुंबई वगळता महापालिका क्षेत्रात ५.९५ टक्के दरवाढ करण्यात आली. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.३९ टक्के वाढ करण्यात आली. मुंबई सोडून राज्यातील अन्य भागात सरासरी ४.३९ टक्के दरवाढ केली आहे. मुंबईसह राज्याची सरासरी रेडी रेकनर दरात ३.८९ टक्के वाढ करण्यात आली आहे.

सोलापूर, उल्हासनगर, अमरावतीला मोठी वाढ
राज्यातील २८ मनपाच्या क्षेत्रात सरासरी ५.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे. सोलापूरला सर्वाधिक १०.१७ टक्के, उल्हासनगरला ९ टक्के, अमरावतीला ८.०३ टक्के, ठाणे मनपा येथे ७.७२ टक्के वाढ करण्यात आली आहे. सर्वांत कमी दरवाढ नांदेड वाघाला मनपामध्ये ३.१८ टक्के वाढ करण्यात आली आहे.
प्रभात -भांडारकर रस्त्यावर सर्वाधिक दर
पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात रेडी रेकनरचा सर्वाधिक दर ८६ हजार ७१० रुपये प्रति चौरस मीटर आहे. त्यापाठोपाठ गरवारे हायस्कूल, एसएनडीटी, कर्वे रस्ता या भागात ८१ हजार ५२० रुपये, ज्ञानेश्‍वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्ता या भागात ७७ हजार ९५० रुपये, गोखले चौक, बाजीराव रस्ता परिसरात ७७ हजार २२० रुपये चौरस मीटर रेडीरेकनर दर झाला आहे.

इष्टांकाच्या १०५ टक्के महसूल जमा
राज्यात मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी कालपर्यंत ५७, ४२२ कोटी रुपये महसूल जमा झाला. या आर्थिक वर्षांत ५५ हजार कोटी रुपये इष्टांक (टार्गेट) गृहीत धरले होते. त्या तुलनेत १०५ टक्के महसूल जमा झाला आहे. आज शेवटच्या दिवशीही राज्यात मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी झाली. राज्यात कालपर्यंत २९ लाख १२ हजार ७८३ दस्तांची नोंदणी झाली.
………

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!