पुणे : (पुणे 24तास ब्युरो )

राज्यात मागील काही आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू होऊ लागली आहे. मात्र थंडीचा कडाका रात्री जास्त असल्याचे दिसून आले आहे. मात्र दिवसा चांगलाच उकाडा जाणवत आहे. दरम्यान किमान तापमानात घट होत असल्यामुळे पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.दरम्यान बुधवारी ब्रम्हपुरी येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 12.4 एवढे कमी तापमानाची नोंद झाली. असे असले तरी दिवसा उकाडा जाणवत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील काही आठवड्यापासून थंडी गायब झाली होती. दरम्यान सद्या हिमालयीन भागासह पंजाब,हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान या भागात सध्या बर्फवृष्टी होत आहे. तसेच सकाळी दाट धुके पसरत आहे. परिणामी या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे गायब झालेल्या थंडीत पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तसेच कोरड्या हवामानामुळे देखील थंडीत वाढ होत आहे.
———————————

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























