Friday, August 21, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेनोंदणी विभागात नागरिकांची गैरसोय

नोंदणी विभागात नागरिकांची गैरसोय

राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करा; युवक काँग्रेसची मागणी  

पुणे :  (पुणे 24 तास ब्युरो )

नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र कार्यालय, तसेच पुण्यासह राज्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त   इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याच्या महसूल विभागाला नागरिक दस्त नोंदणीच्या माध्यमातून प्रचंड महसूल निर्माण करून देत असतात.मात्र, सर्वसामान्य नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयामध्ये साधी बसायची सोय उपलब्ध नसल्याचे अनेक ठिकाणी आढळते. 

नोंदणी महानिरीक्षकांच्या कार्यालयात नागरिकांसाठी प्रतिक्षा कक्ष उपलब्ध नाही. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. काही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतू, सद्यस्थितीत ते बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

राज्यभरातील बऱ्याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयात नागरिकांना पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. यावेळी पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, दीपक चौगुले हे उपस्थित होते.

कोट :

दस्त नोंदणीच्या माध्यमातून हजारो कोटींचा महसूल नागरिकांमुळे प्रशासनाला मिळत असतो. नोंदणी महानिरीक्षक कार्यालय व राज्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सिसीटीव्ही कॅमेरा, प्रतिक्षा कक्ष ह्या गोष्टींची पूर्तता जर अधिकारी करू शकत नसतील तर खेदाची बाब आहे. नागरिकांसाठी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही आमची मागणी आहे.

–  रोहन सुरवसे पाटील 

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!