Friday, August 28, 2026
spot_img
Homeउद्योगरेडीरेकनरचेदर आज ठरणार : किमान 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

रेडीरेकनरचेदर आज ठरणार : किमान 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

पुणे  (पुणे 24 तास ब्युरो )
    राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे सोमवारी रेडीरेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्यदर)  जाहीर  होणार आहेत. त्यानुसार किमान 10 टक्क्यांनी रेडीरेकनरचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.  लाडकी बहिण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता अधिक आहे.
   राज्यात रेडीरेकनरचे दर दरवर्षी एक एप्रिलपासून लागू होतात. रेडीरेकनरचे दर जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन आपला अहवाल पाठवून दिला आहे. त्यासोबतच मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी, बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आदींची माहिती घेऊन दर ठरविण्यात आले आहेत.
    पुणे, मुंबई महानगर, ठाणे आणि राज्याच्या इतर भागांत जमिनींच्या वार्षिक बाजार मूल्यदरात विषमता दिसून आली आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात रेडीरेकनर दरापेक्षा जास्त किमतीने; तसेच कमी किमतीनेही व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यासह राज्यातील महानगरांत अनेक ठिकाणी नव्याने विकसित होणार्‍या भागांत रेडीरेकनरच्या दरांपेक्षा अधिक किमतीने व्यवहार होत आहेत. सन 2020 मध्ये सप्टेंबर महिन्यात दरवाढ करताना मुंबईत रेडीरेकनरच्या दरांपेक्षा कमी किमतीत व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने तेथील दर 0.6 टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. त्यानुसार आताही रेडीरेकनरच्या दरांपेक्षा अधिक किमतीने व्यवहार होत असलेल्या ठिकाणी दरवाढ करावी आणि रेडीरेकनरच्या दरांपेक्षा कमी किमतीने व्यवहार होत असलेल्या ठिकाणी दर कमी करावे लागणार आहेत. या दरांत सुसूत्रीकरणाचा प्रयत्न असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले.
—————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!