पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे सोमवारी रेडीरेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्यदर) जाहीर होणार आहेत. त्यानुसार किमान 10 टक्क्यांनी रेडीरेकनरचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. लाडकी बहिण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यात रेडीरेकनरचे दर दरवर्षी एक एप्रिलपासून लागू होतात. रेडीरेकनरचे दर जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन आपला अहवाल पाठवून दिला आहे. त्यासोबतच मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी, बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आदींची माहिती घेऊन दर ठरविण्यात आले आहेत.
पुणे, मुंबई महानगर, ठाणे आणि राज्याच्या इतर भागांत जमिनींच्या वार्षिक बाजार मूल्यदरात विषमता दिसून आली आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात रेडीरेकनर दरापेक्षा जास्त किमतीने; तसेच कमी किमतीनेही व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यासह राज्यातील महानगरांत अनेक ठिकाणी नव्याने विकसित होणार्या भागांत रेडीरेकनरच्या दरांपेक्षा अधिक किमतीने व्यवहार होत आहेत. सन 2020 मध्ये सप्टेंबर महिन्यात दरवाढ करताना मुंबईत रेडीरेकनरच्या दरांपेक्षा कमी किमतीत व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने तेथील दर 0.6 टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. त्यानुसार आताही रेडीरेकनरच्या दरांपेक्षा अधिक किमतीने व्यवहार होत असलेल्या ठिकाणी दरवाढ करावी आणि रेडीरेकनरच्या दरांपेक्षा कमी किमतीने व्यवहार होत असलेल्या ठिकाणी दर कमी करावे लागणार आहेत. या दरांत सुसूत्रीकरणाचा प्रयत्न असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले.
—————————-

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























