पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत केले स्पष्ट

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
वाहतूक कोंडी मुक्त वाघोली करण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर संबंधित यंत्रणेच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश
कुमार यांनी स्पष्ट केले.
वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विभागाची संयुक्त बैठक वाघोलीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीपूर्वी त्यांनी चालत जावून वाहतूक कोंडीची करणे जाणून घेतली. या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव, पीएमपीएमएलच्या दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, महावितरण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही. आसा कडक इशाराही त्यांनी दिला. वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना केल्या गेल्या याचा १० फेब्रुवारी रोजी पुन्हा आढावा घेतला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त बैठक आणि पाहणी दरम्यान विविध समस्या आणि त्या समस्यांचे निवारण कशाप्रकारे करता येईल यावर चर्चा झाली. या संदर्भात ५०० सूचना आल्या होत्या. या प्रसंगी रामदास दाभाडे, अनिल सातव, समीर भाडळे, संदीप सातव, मच्छींद्र सातव, चंद्रकांत वारघडे, आदी उपस्थित होते.
–
आयुक्तांनी दिलेल्या कडक सूचना
महापालिका, पी एम.आर डी ए सह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची चालढकल करून नये.
खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर थांबायला नको.
वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
नशेचे पान विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करावी.
निधी कमी पडू देणार नाही
महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करून सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यासोबतच राज्य शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणार्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत यापुढे संबंधित विभागांनी चाल ढकलपणा करू नये. रस्ता दुरुस्ती व इतर कामांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अशा स्पष्ट सूचना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी बैठकीमध्ये दिल्या.
स्वतःहून अतिक्रमणे काढली
आयुक्त अमितेश कुमार, आमदार कटके व इतर अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी अतिक्रमणे काढण्याची चर्चा झाली. काही व्यापाऱ्यांनी रात्री स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























