Homeक्राईमविमाननगरमध्ये मोटारीची काच फोडून दहा लाखांची चोरीविमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद..

विमाननगरमध्ये मोटारीची काच फोडून दहा लाखांची चोरी
विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर भागात आले होते. विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री मोटार लावली. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारींच्या काच फोडून रोकड, लॅपटाॅप, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर भागात दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!