Homeताज्या बातम्याशहरातील 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकाकडे ई रजिस्ट्रेशन सुविधा

शहरातील 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकाकडे ई रजिस्ट्रेशन सुविधा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नविन बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणीसाठी “ई-रजिस्ट्रेशन’ संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल दिसून येत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील सुमारे 100 पेक्षा अधिक बांधकाम प्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन सुविधेचा वापर करून दस्त नोंदणी होत आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन प्रणालीद्वारे दस्त नोंदणी करता येते, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.

नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यात नोंदणी व मुद्रांक विभाग अग्रेसर आहे. मागील काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून ई रजिस्ट्रेशन या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. ज्या बांधकाम प्रकल्पांना संबधित नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी, एनए तसेच रेराचे प्रमाणपत्र आहे, अशा विकसकांना ई रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून विकसकांना स्वत:च्या प्रकल्पातील सदनिका खरेदी-व्रिकीचे दस्त या सुविधोच्या माध्यमातून कार्यालयातूनच अपलोड करता येतील. ते मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येते. राज्यात पाचशे पेक्षा अधिक दुय्यम निंबधक कार्यालये आहे. राज्यात महिन्याला विविध प्रकारचे सरासरी दोन लाख दस्त नोंदविले जातात. मागील काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नविन बांधकाम प्रकल्पांना या सुविधेचा फायदा होत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून 27 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. ई रजिस्ट्रेशन सुविधेबाबत बांधकाम व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सुविधेचा वापर करणार्या प्रकल्पांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येत असल्याने त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही, अशी माहिती हिंगाणे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!