
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
संविधानानुसार राज्यकारभार चालणारा भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपण सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय राज्यघटनेचे पालन करून स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता अबाधित राखण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा, खेळ व सांस्कृतिक बाबतीत यश मिळवावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले.
हडपसरमधील साधना विद्यालयात ७६व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तुपे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजास व पाहुण्यांना एन.सी.सी., आर.एस.पी.व स्काऊट छात्रांनी मानवंदना दिली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तंबाखू सेवन विरोधी प्रतिज्ञा प्रतापराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी रयत जनरल बॉ़डी सदस्य अरविंद भाऊ तुपे, आयर्नमॅन ज्येष्ठ उद्योजक दशरथ जाधव, प्राचार्य डॉ. साळुंखे, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, आईसाहेब फाऊंडेशनचे अनिल पाटील, मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत उपस्थित होते.
प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविक केले. अनिल वाव्हळ व रूपाली सोनावळे यांनी निवेदन केले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























