Homeताज्या बातम्याअजित पवार यांच्या मुलाचा आज पुण्यात साखरपुडा

अजित पवार यांच्या मुलाचा आज पुण्यात साखरपुडा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या मुलगा जय पवार यांचा आज, 10 एप्रिल रोजी पुण्यात साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा खासगी स्वरूपाचा असून, त्यात पवार कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोजकेच नातेवाईक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जय पवार यांचं ऋतुजा पाटील यांच्यासोबत लग्न ठरलेलं असून, ऋतुजा या सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रवीण पाटील यांच्या मुलगी आहेत.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी साखरपुड्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने, हे नातं केवळ कुटुंबापुरतंच न राहता, एकप्रकारे राजकीय सौहार्दाचंही प्रतीक बनत आहे.

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-9259715258649653&output=html&h=360&adk=2061893045&adf=1335320620&pi=t.aa~a.1954902099~i.2~rp.4&w=360&abgtt=7&lmt=1744284509&num_ads=1&rafmt=1&armr=3&sem=mc&pwprc=8855039701&ad_type=text_image&format=360×360&url=https%3A%2F%2Fnewsworldmarathi.com%2F%3Fp%3D3429&host=ca-host-pub-2644536267352236&fwr=1&pra=3&rh=267&rw=320&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=27&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTAuMC4wIiwiIiwidml2byAxOTM1IiwiMTM1LjAuNzA0OS4zOCIsbnVsbCwxLG51bGwsIiIsW1siR29vZ2xlIENocm9tZSIsIjEzNS4wLjcwNDkuMzgiXSxbIk5vdC1BLkJyYW5kIiwiOC4wLjAuMCJdLFsiQ2hyb21pdW0iLCIxMzUuMC43MDQ5LjM4Il1dLDBd&dt=1744284509056&bpp=15&bdt=1817&idt=16&shv=r20250408&mjsv=m202504070101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D60bdcef5cd2f9278%3AT%3D1743819373%3ART%3D1744284486%3AS%3DALNI_MZ_2HHqlLhdv4re0fRRGzIhmXo22g&gpic=UID%3D00001089fb05608a%3AT%3D1743819373%3ART%3D1744284486%3AS%3DALNI_MbcxIrT3IU-yyseI_RsoOSpHVLJDA&eo_id_str=ID%3D230d340522b6bd5d%3AT%3D1743819373%3ART%3D1744284486%3AS%3DAA-AfjaziUUPPhBPOuhf1Wzmu9wl&prev_fmts=0x0&nras=2&correlator=6687842294595&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=1&u_h=780&u_w=360&u_ah=780&u_aw=360&u_cd=24&u_sd=3&dmc=8&adx=0&ady=1241&biw=360&bih=649&scr_x=0&scr_y=0&eid=95355972%2C95355974%2C31091604%2C95330278%2C95353451%2C95354563%2C95357878%2C95357716%2C95340253%2C95340255&oid=2&pvsid=1472669193166422&tmod=319083891&uas=0&nvt=1&fc=1408&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C705%2C360%2C705&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&cms=2&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&pgls=CAEaBTYuNy4y~CAEQBBoHMS4xNTAuMA..&ifi=2&uci=a!2&btvi=1&fsb=1&dtd=45

जय पवार सुरुवातीला राजकारणापासून दूर राहिले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर त्यांनी सक्रियता वाढवली आहे. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर, घरच्याच राजकीय भूमिकेमुळे जय पवार यांनाही पुढे यावं लागलं.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याची खूण मानले जात आहेत. विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय अंतर लक्षात घेतलं, तर या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येत असल्याची बातमी राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरतेय.

कोण आहे ऋतुजा पाटील?
जय पवार यांचा साखरपुडा फलटण येथील प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत ठरला आहे. ऋतुजा या एक सोशल मीडिया कंपनी सांभाळतात आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांची बहीण प्रसिद्ध केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातल्या घरात सून म्हणून आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता हे नातं अधिकृत होत असून दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!