Homeक्राईमअटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन येत्या १५ दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी ३५९ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही; तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्कही सांगितलेला नाही. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून अशा वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.

वाहने सोडवून घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यापैकी रस्त्यावर वापरण्यायोग्य वाहनांचा लिलाव https://eauction.gov.in या संकेतस्थळावर आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या व वापरण्यायोग्य नसलेल्या वाहनांचा लिलाव https://www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे- १ येथे साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!