Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeउद्योगअवघ्या चार तासांमध्ये नादुरूस्त रोहित्र बदलले

अवघ्या चार तासांमध्ये नादुरूस्त रोहित्र बदलले

; मांजरीतील वीजग्राहकांना दिलासा

पुणे( (पुणे 24 तास ब्युरो )

: उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. ९) रात्री १० च्या सुमारास नादुरुस्त झालेले ६३० केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र अवघ्या चार तासांमध्ये बदलून पहाटेला वीजपुरवठा पूर्ववत केला. यामुळे मांजरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

याबाबत माहिती अशी की, बंडगार्डन विभाग अंतर्गत मांजरीमधील झेड कॉर्नरच्या शेजारी चिंतामणी कॉलनी, शिवकृष्णा लॉन्स, मांजरी-मुंढवा मुख्य रस्ता या परिसराला वीजपुरवठा करणारे ६३० केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र बुधवारी (दि. ९) रात्री १० च्या सुमारास बंद पडले. परिणामी सुमारे १४०० घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी रोहित्राची पाहणी केली असता ते पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे व बदलणे आवश्यक असल्याचे दिसून आले. दुसरीकडे रात्री भयंकर उकाडा असल्याने व पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने नागरिक हैराण झाले होते.

या संदर्भात अधीक्षक अभियंता (प्र.) श्री. रवींद्र बुंदेले यांनी तातडीने सूचना देत लगेचच रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रोहित्राची वाहतूक करण्यासाठी ट्रक व क्रेनची मध्यरात्रीच व्यवस्था करण्यात आली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी नवीन ६३० केव्हीए रोहित्र तातडीने उपलब्ध करून दिले. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास नादुरुस्त रोहित्र हटवून त्याठिकाणी नवीन रोहित्र लावण्याचे काम सुरु झाले व पहाटे ४ च्या सुमारास ते पूर्ण झाले. यानंतर ४.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. या कालावधीत नागरिकांनी देखील महावितरणला सहकार्य केले.

अवघ्या चार तासांमध्ये वितरण रोहित्र बदलण्याची कामगिरी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे, सहायक अभियंता अभिजित सांगळे, जनमित्र किरण कुंभार, लालू जगवार, पंकज टेकम, शुभम बोरवली, राजू जाधव, विशाल माने, स्वराज तायडे यांनी केली. तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव खटावकर, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, गणेश शेळके, ओंकार कुलकर्णी यांनी सहकार्य केले.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!