Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगऊस पेटवल्याने महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण, पिंपरी, भोसरीमध्ये तासभर वीज...

ऊस पेटवल्याने महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण, पिंपरी, भोसरीमध्ये तासभर वीज खंडित

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

 मरकळ-आळंदी दरम्यान एका शेतात टॉवर लाइनखाली ऊस पेटवल्यामुळे महापारेषणच्या लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी ३१४ मेगावॅटची तूट निर्माण झाली आणि स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी व भोसरी एमआयडीसी परिसरातील सुमारे १ लाख ८९ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी (दि. २३) सकाळी १०.०९ ते ११.०६ वाजेपर्यंत खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये सकाळी १०.०९ वाजता ट्रिपिंग आल्यामुळे तब्बल ३१४ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. परिणामी तळेगाव-चाकण ४०० केव्ही टॉवर लाइनच्या वीजभारात मोठी वाढ झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्ही, चाकण २२० केव्ही, चिंचवड २२० केव्ही, भोसरी २२० केव्ही आणि ब्रीज स्टोन २२० केव्ही अशा ५ अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. सोबतच या उपकेंद्रांतून महावितरणच्या १६ उपकेंद्रांना व १२९ वीजवाहिन्यांना होणारा वीजपुरवठा देखील खंडित झाला.

एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे आदी गावांतील ९०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. तसेच पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, पुनावळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, तुकाराम नगर, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, ब्लॉक टी, जे व एस आदी परिसरातील सुमारे दीड लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी १०.०९ ते ११ वाजेपर्यंत बंद होता.   

लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये मरकळ-आळंदी मार्गावर एका शेतात टॉवर लाइनखालीच ऊस पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या ऊसाच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ऊसाची आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!