Homeताज्या बातम्याएकत्र येण्यासाठी वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य : युगेंद्र पवार

एकत्र येण्यासाठी वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य : युगेंद्र पवार

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
कुटुंब म्हणून पवार एकत्रच आहेत. आम्ही राजकारण आणि कौटुंबिक संबंध नेहमीच वेगळे ठेवले आहेत. राजकारणात एकत्र यायचे की नाही याचा निर्णय खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. आम्ही ज्युनिअर आहोत. शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच करावा लागेल, असे युवा नेते युगेंद्र पवार म्हणाले. विद्या प्रतिष्ठानमधील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राजकारणातील मनोमीलनाबद्दल ते म्हणाले, शरद पवार, अजित पवार यांनी निर्णय घेतल्यास आमची हरकत नाही. सुप्रिया सुळे यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र येणे चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे, त्यावर मी खूप ज्युनिअर आहे. ते ज्या ठरवतील त्याच्याशी आम्ही सहमत असतो, असे युगेंद्र म्हणाले. एकत्र येण्यासंबंधी कुटुंबात चर्चा होत असतात असेही ते म्हणाले.

राजकारणात विचार बदलू शकतात, परिस्थितीनुसार काही काही गोष्टी कराव्या लागतात. पण कुटुंब म्हणून तुम्ही ते तोडू शकत नाही, शेवटी रक्ताचं नाते असते, तुम्ही ठाकरे, मुंडे किंवा कोणतेही राजकीय कुटुंब पहा. कौटुंबिक कार्यक्रमाला सगळेच एकत्र येत असतात. ती आपली परंपरा आहे. आम्हीही ती पुढे नेत आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र आले तर काय होईल हे बघायला आवडेल असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले.

चौकट:

काका,काकी बद्दल आदर कायम

वाढदिवशी खा. सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेत आशीर्वाद घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या माझ्या काकी आहेत. आम्ही ३०-३२ वर्ष एकत्र होतो. मग ते राजकारण म्हणून असो की कुटुंब म्हणून असो. एखादे वर्ष आमचे वेगळे गेले म्हणजे सगळे संपते या विचारांचा मी तरी नाही. काकींबद्दल (खा. सुनेत्रा पवार) माझ्या मनात प्रेम, आदर आहे, तो कमी होण्याचा प्रश्न नाही. काका अजित पवार असतील किंवा काकी नाती कायम आहेत, यापुढेही आदर कायम राहिल असे ही युगेंद्र पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!