Sunday, August 23, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याएकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत

एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत

१८ हजार ८८२ पदे भरणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पुणे 🙁 पुणे 24 तास ब्युरो )

–महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे ही भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला बाल विकास विभाग करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे. सरळसेवेने ८० तर निवडीद्वारे १०० टक्के पदे भरली जात आहेत.

आज मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक आणि तणामुक्त वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिल्या.

याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्यात यावी.

महिला बचत गटांचे आदर्श कम्युनिटी किचन

दरम्यान, महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वोतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुरक पोषण आहार बंद केलेला पुरवठा त्वरीत सुरू करण्यात यावा. आहारासाठी प्रत्येक लाभार्थीची रक्कम वाढविण्यात यावी. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करणेबाबत निर्णय घेण्यात येईल.

भिवंडी निजामपूर महानगर पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविणे बाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नगरपालिकेत एक महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्ग खोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!