Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याकल्पनाशक्ती जोपासत भविष्यातील संधीचा लाभ घ्या - महेश लोटके

कल्पनाशक्ती जोपासत भविष्यातील संधीचा लाभ घ्या – महेश लोटके

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक कल्पना सुचतात, परंतु या कल्पना वास्तवात रूपांतरित होतातच असे नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती जोपासत त्यातून भविष्यातील संभाव्य संधीचा लाभ घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाने ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, असे मत औद्योगिक ऑटोमेशन आणि व्यवसाय वृध्दीतील तज्ज्ञ महेश लोटके यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते मावळ येथे ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कल्पनांचे वास्तवात रूपांतर करणे’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी देशभरातून एक हजार पेक्षा अधिक प्रवेशिका तर साडेतीनशे पेक्षा अधिक संघ सहभागी झाले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांचा विचार करून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मुक्तहस्ते केला पाहिजे, असे डॉ. मणीमाला पुरी म्हणाल्या.
दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे आपण पाहतो. याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सुलभ वापर करून जीवन अधिक समृद्ध कसे होईल याचा विचार केला पाहिजे; याकडे डॉ. सुदीप थेपडे यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

स्पर्धेतील विजेते संघ – प्रथम क्रमांक – ड्रॅकोनिक्स- पिंपरी चिंचवड विद्यापीठ; द्वितीय – टीम कोडी – फा. कॉन्सेकाओ रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मुंबई; तृतीय – टीम अल्निग्मा, केकेडब्ल्यू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नाशिक.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. दीपा परासर अमिटी विद्यापीठ, मुंबई, रजत जाधव वरिष्ठ अभियंता, रोबोटिक्स ऑटोमेशन, ऑटोफिना रोबोटिक्स ऑटोमेशन प्रा. लि., तळेगाव, पुणे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन डॉ. नीरू मलिक, डॉ. सागर पांडे, प्रा. अंकुश डहाट, आणि प्रा. तुषार माहोरे यांनी केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थी आणि विजयी संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!