Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याकेळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रियाउद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार असून त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ मे. टन पर्यंत वाढवण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, या पिकासाठीची सर्व टप्प्याची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. कृषी विद्यापीठे आणि प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागतील.

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यामध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७ हजार ६०० मे. टन उत्पादन होते. आगामी पाच वर्षात हे क्षेत्र ३ हजार हेक्टरवर आणि उत्पादन सुमारे २ लाख मे. टन वर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी सांगितले.

या उत्पादन वाढीसाठी तसेच वाढणाऱ्या उत्पादनावरील प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनेतून अर्थसाहाय्य करणे, शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ तसेच अन्य माध्यमांचा उपयोग करावा, असेही जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.

यावेळी स्ट्रॉबेरी, मिरची, आंबा, स्वीट कॉर्न व बेबी कॉर्न, सूर्यफूल आदी पिकांचे क्लस्टर करण्याच्यादृष्टीनेही चर्चा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!