Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याग्रामीण भागात घरे, कृषीपपाना वीज दरात सवलत, रस्ते विकासाला गती

ग्रामीण भागात घरे, कृषीपपाना वीज दरात सवलत, रस्ते विकासाला गती

पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना निधी अशा लोकोपयोगी आणि राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांच्या आणि निव्वळ भार 4 हजार 245 कोटी 94 लाख रुपये असलेल्या पुरवणी मागण्या आज विधीमंडळात सादर करण्यात आल्या.

आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2024-25 च्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. सादर केलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांपैकी 932.54 कोटींच्या मागण्या अनिवार्य, 3,420.41 कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आणि 2,133.25 कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्या आल्या आहेत. 6,486.20 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा. 4,245.94 कोटी रुपये आहे. सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-
(रुपये कोटीत)
अ.क्र बाब रक्कम समायोजना नंतरची रक्कम
1 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वसाधारण व अ.ज. घटकातील लाभार्थ्यांकरिता पुरवणी मागणी 3752.16 2779.05

2 मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजना- कृषिपंप ग्राहकांना (सर्वसाधारण, अ.जा. व अ.ज. घटक) वीजदर सवलत देण्यासाठी. 2000.00 1688.74

3 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1450.00 लाक्षणिक
4 राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान NRLM योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र व राज्य हिस्स्यापोटी 637.42 लाक्षणिक
5 मुद्रांक शुल्क अनुदान – महानगरपालिका व नगरपालिका 600.00 600.00
6 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता 375.00 257.03
7 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिस्सा 335.57 लाक्षणिक
8 ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांची रक्कम, विद्युत देयकांच्या व्याज व दंडाची रक्कम महावितरणला अदा करण्यासाठी 300.00 209.55

9 राज्यातील ४ साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलनिर्मितीसाठी मार्जिन मनी लोन 296.00 296.00
10 पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी 244.00 लाक्षणिक
11 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 221.89 लाक्षणिक
12 गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी 175.00 लाक्षणिक
13 राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी, पुणे- प्रदुषण कमी करण्याचा प्रकल्प 171.00 103.51
14 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेसाठी 150.00 150.00
15 धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान- केंद्र हिस्सा 100.00 लाक्षणिक
16 यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करणेबाबत. 100.00 लाक्षणिक

विभागनिहाय प्रस्तावित पुरक मागण्या- मार्च, 2025

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

  1. ग्राम विकास विभाग 3006.28
  2. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग 1688.74
  3. नगर विकास विभाग 590.28
  4. उच्च व तंत्र शिक्षण विभाग 412.36
  5. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 313.93
  6. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग 255.51
  7. महसूल व वन विभाग 67.20
  8. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 67.12
  9. सार्वजनिक बांधकाम विभाग 45.35

—-०००००—–

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!