Thursday, August 27, 2026
spot_img
Homeआरोग्यदीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेला प्रकार असंवेदनशील-मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेला प्रकार असंवेदनशील-मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

-संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणणार
पुणे  (पुणे 24 तास ब्युरो )
 दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात  अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र,नुकताच घडलेला  प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. दरम्यान संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी महसूल विभागने राज्यातील अधिका-यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आले होते. त्यावेळी पत्रकांराशी ते पत्रकारांशी बोलत होते.
   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,“  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला मला आनंद आहे,  जोपर्यंत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
    तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. भविष्यात त्यादृष्टीने कायद्यात बदल केला जाईल. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!